Call Us

+91 80803 39950

Address

Vasantgad, Karad, Satara, Maharashtra.

॥वसंतगडकर अधिष्ठान ॥

अनाहत ध्यान केंद्र , श्री क्षेत्र वसंतगड
श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्थ संस्था, ता. कराड, जी. सातारा

॥ VASANTGADKAR FOUNDATION ॥

Anahat Meditation Center, Sri Kshetra Vasantgad
Shri Sadguru Janardhan Maharaj Vishvasth Foundation, Karad, Satara.

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी ।
हे नाथ नारायण वासुदेव ।।

SHRI KRISHNA GOVIND HARE MURARI ।
HE NATH NARAYAN VASUDEV ।।

राम कृष्ण हरी,
माय – बाप, बंधू भगिनींच्या चरणी साष्टांग दंडवत, भावंडानो चार वेद, सहा शास्त्रे ,अठरा पुराणे, श्रुतीग्रंथ तसेच अनेकांनी गीतेच्या चिंतनातून मांडलेल्या भगवंत अगदी ज्ञानदेवांपासून तुकोबारायापर्यंत सर्वांनी एका निर्गुण परमात्मायांच्या भजन गायलं सर्व ऋषीमुनींनी त्यांच्या साहित्यातून भगवंत प्राप्त करण्याची एकच विधी सांगितली ती म्हणजे नामस्मरण (ध्यान ) या सर्वांच्या विचारमंथनातून एकच संशोधन झाले. ते म्हणजे ध्यान धारणेच्या माध्यमातून परमानंदाची अनुभूती.
Ram Krishna Hari,
I humbly bow in front of Mother, father, brothers and sisters. Dear all, of all the four Vedas, the six Shastras, the eighteen Puranas, the Shruti Granth, and the Lord who was presented by many through the contemplation of the Gita, even from Gnyandeva to Tukobaraya, all of them sang the hymns of the One Nirgun Paramatmaya. According to All the research there is only one way to Attain God and that is through (DHYAN) “MEDITATION”. That is the feeling of ecstasy through meditation.

|| मंथुनी नवनीत तैसे घे अनंता ||

|| MANTHUNI NAVNEET TAISE GHE ANANTA ||

समर्थांच्या या उक्तीप्रमाणे सर्व संतसाहित्याच्या नवनिताचे मंथन करून. आनंदस्वरूप लोणी प्राप्त करता येईल. वृत्ती निवृत्ती झाल्याशिवाय, बुद्धी स्थिर झाल्याशिवाय, जिवा शिवाची ऐक्यता झाल्याशिवाय शितल शांतीचा, सच्चिदानंद रूपाचा अनुभव घेता येणार नाही. त्यासाठी अनासक्त होऊन, साधकाची ओढ साधनेकडे लागावी व त्याला साधनेसाठी पोषक वातावरण प्राप्त व्हावे म्हणून ध्यानासाठी प्रशस्त हवेशीर ध्यान मंदिर साधकांना शिबिरार्थींना निवाऱ्याची सात्विक भोजनाची संत साहित्याची सोय व्हावी यासाठी सर्व सुविधांनी युक्त वैखरी व अनाहत ध्यान साधना अधिष्ठान उभे करीत आहोत. आम्ही सर्व सद्गुरु सेवक हा परमार्थिक शिवधनुष्य उचलतोय खरं, परंतु त्याला आपल्या सारख्या थोर दांशुर दात्यांचा हात भर हात भार लागल्यास, तो सहज पेलता येईल, सत्य संकल्पाचा दाता नारायण…
By churning the Navnita of all the scriptures according to this saying of the sages. Butter can be obtained as pleasure. One cannot experience Shital Shanti, Satchidananda form unless the attitude is retired, the intellect is stabilized, the soul is united with Shiva. For this, we are setting up Vaikhari and Anahat Dhyana Sadhana Adhishthana with all the facilities so that the Sadhaka will be attracted to Sadhana and get a Supportive atmosphere for Sadhana. It is true that we all Sadguru sevak are lifting the bow of godly Shiva, but if he is burdened by great dansura donors like us, he can be easily overcome, Narayan, the giver of true resolution…
यारे यारे लहानथोर | या ती भरती नारी नर |
अवघा करूया विचार | नलगे चिंतक कवणाशी ||

YARE YARE LAHANTHOR | YA TI BHARTI NARI TAR|
AVDHYA KARUYA VICHAAR | NALGE CHINTAK KAVNASHI ||

आपले नम्र

संत चरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर

संस्थापक कार्याध्यक्ष

Your humble

SANT CHARANRAJ BALKRISHNA DADA VASANTGADKAR

Founding President

|| गुरू हा सुखाचा सागर ||

निम्बर्गी संप्रदायातील थोर सद्गुरु गुरुलिंग जंगम महाराज (निम्बर्गी कर्नाटक), सद्गुरु गुरुदेव रानडे (निंबाळ कर्नाटक) सद्गुरु सिद्धरामेश्वर महाराज( पाथरी महाराष्ट्र) सद्गुरु धोंडोपंत महाराज (सोलापूर महाराष्ट्र) यांच्या गुरू-शिष्य परंपरेतील ब्रह्मलिन वैकुंठवासी सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांचे सदशिष्य, सुपुत्र आणि उत्तराधिकारी.

* शिक्षण -एम. ए. मराठी (संत वांडःमय)  * साऊंड इंजिनिअर (मुंबई) * संगीत विशारद गांधर्व महाविद्यालय पुणे

* प्रापंचिक कर्तव्य आधी प्रपंच करावा नेटका या उक्तीप्रमाणे ७ वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले

* २५ वर्षे धनी मुद्रक म्हणून व्यवसाय केला या नोकरी व व्यवसाय या दरम्यान संत साहित्याचे चिंतन ग्रंथ पठण ध्यान संगीत साधना केली.

|| GURU IS THE OCEAN OF HAPPINESS ||

Coming from the Guru-Disciple Tradition of Great Sadguru Gurulinga Jangam Maharaj of Nimburgi sect (Nimburgi Karnataka), Sadguru Gurudev Ranade (Nimbal Karnataka) Sadguru Siddharameshwar Maharaj (Pathari Maharashtra) Sadguru Dhondopant Maharaj (Solapur Maharashtra) , Brahmalin Vaikunthavasi Sadhguru Janardhan Maharaj Vasantgadkar’s disciple, son and successor of in his guru-disciple tradition, Sant Charan Raj Balkrishna Dada Vasantgadkar.

* Education -M. A. Marathi (Sant Vandahmay) * Sound Engineer (Mumbai) * Sangeet Visharad Gandharva College Pune

* Worked as a professor for 7 years as per the saying, worldly duty should be done first

* Worked as a rich printer for 25 years. Between this job and business, he practiced meditation, reading, meditation, and music.

त्रिविध तापे तपला | संसार दुखे दुखावला|
तोचि अधिकारी झाला  | परमार्थाशी||

TRIVIDH TAPE TAPLA| SANSAR DUKHE DUKHAVLA|
TOCHI ADHIKARI ZALA | PARMARTHASHI||

समर्थांचं या उक्तीप्रमाणे संसारिक अनुभव घेऊन उर्वरित आयुष्य ईश्वरी कार्यात समर्पित केले. महाराष्ट्र, देश विदेशामध्ये जाऊन संत साहित्यातील अध्यात्मिक तत्व ( गुढगंमय), किर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून मनुष्य पर्यंत पोहोचवून अध्यात्मिक चिंतनाचे आणि ध्यानाचे महत्त्व रुजविले. अनुग्रह व ध्यान धारणे च्या माध्यमातून मानवाच्या शरीरामध्ये वैश्विक शक्तीचा किंबहुना परमानंदाचा अनुभव प्रत्येक मनुष्य जीवाला आला पाहिजे. हीच तळमळ उराशी बाळगून संपूर्ण आयुष्य परमार्थासाठी झोकून दिले. संत साहित्याच्या प्रचार व प्रसार करून.

देव झाले अवघे जन| किंवा आनंदाचे आवरू मांडू जगा|
या संतवचना प्रमाणे दादांची परमार्थिक वाटचाल सुरू आहे.

– जय गुरुदेव

संत चरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर

संस्थापक कार्याध्यक्ष
श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था, वसंतगड, ता. कराड जि. सातारा

After taking worldly experience as mentioned, he devoted the rest of his life to divine work. In Maharashtra, the country and abroad, the spiritual essence of the saint’s literature (Gudgammay), through kirtan and discourse, was conveyed to the people and the importance of spiritual contemplation and meditation was established. Through grace and meditation, every human being should experience the universal power in the human body, in fact ecstasy. Keeping this yearning in his heart, he devoted his entire life to altruism. By propagating and disseminating Saint Literature.

“GOD BECAME ONLY PEOPLE OR LIVE HAPPILY EVER AFTER”

According to this saint's words, Dada's selfless journey is going on.

Jai Gurudev

SANTCHARANARAJ BALKRISHNA DADA VASANTGADKAR

Founding President
Shri Sadguru Janardhan Maha Raj Trustee, Vasantgad, Tt. Karad District Satara

|| ध्यान मंदिर संकल्प ||

शुद्ध निश्चल स्थिर आत्मा शरीराच्या संगाने शरीराचे जडत्व स्वीकारतो आणि मीच देह आहे अशा कल्पनेत तो वावरत राहतो या देहात राहून देह बुद्धी न सोडता आपल्या मुळ स्वरूप तत्त्वानुसार शांती आणि आनंद मिळवण्यासाठी धडपड करीत असतो. परंतु देहतादात्म्यामुळे त्याला आत्मानंदाची अनुभूती घेता येत नाही म्हणूनच मनुष्य रुपी शरीराला शांती,समाधान आनंद, मिळण्यासाठी जो विधी करावा लागतो त्या विधीला ध्यान म्हणतात या ध्यानाच्या माध्यमातून मनुष्याला शांती आनंद समाधान आणि स्थिरता मिळावी आणि मनुष्य भव दुःखापासून मुक्त व्हावा त्यांची प्रापंचिक आसक्ती, विषयासक्ती, दूर व्हावी म्हणून वसंतगडकर आश्रमा आवर्ती कमीत कमी शंभर लोक एकावेळी ध्यान करतील असे भव्यदिव्य, हवेशीर ध्यान मंदिर उभारण्याचा संकल्प आहे या पवित्र धर्म कार्यास दात्यांनी भरभरून दान द्यावे आणि ईश्वर कार्यास हातभार लावावा…

|| MEDITATION MANDIR SANKALP ||

He dwells in the idea that the pure, immovable, soul is associated with the body, accepts the inertness of the body and I am the body. Staying in this body without leaving the body consciousness, according to our original nature, we strive to achieve peace and happiness. But he does not get the feeling of Atma Nanda because of the body. That is why the ritual that the human body has to perform to attain peace, contentment and happiness is called meditation. Through this meditation, it is resolved to build a grand and breezy meditation temple where at least one hundred people will meditate on Vasantgadkar Adhishthana at a time so that man can get happiness, peace, joy, contentment and stability and his life will be freed from suffering, his worldly attachment and subject attachment will be removed. Donors should donate generously to this holy work and contribute to God’s cause.
Jai Gurudev

नवविधा भक्तीच्या नावाने अशा पद्धतीचे 9 साधक कुटिर बांधण्याच्या संकल्प

१) श्रवणम् २) कीर्तनम् ३) विष्णुस्मरणम् ४) पादसेवनम् ५) आर्चनम् ६) वंदनम् ७) दास्यम् ८) सख्यम् ९) आत्मनिवेदनम्
वसंतगडकर अधिष्ठानावर, वर्षभर वेगवेगळे आध्यात्मिक उपक्रम होत असतात. अखंड नाम सप्ताह, ध्यान शिबिर सप्ताह, श्रीमद् ज्ञानेश्वरी, संत तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत, दासबोध, संत कबीर दोहे अशा विविध ग्रंथावर अध्यात्मिक निरुपणे श्रवण करण्यासाठी व नाम चिंतनासाठी निवासी शिबिरे होत असतात. वसंतगडकर अधिष्ठानावर आणि श्री सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्यावर श्रद्धा असलेले नामदारक ,साधक व भाविक महाराष्ट्र किंबहुना देश विदेशातून विविध अध्यात्मिक उपक्रमासाठी येत असतात. त्यांच्या निवासाची सोय उत्तमरित्या व्हावी, म्हणून अलिशान सर्व सोयींनी युक्त, भव्य-दिव्य साधक निवास उभारण्याच्या मानस आहे. या कार्यास वस्तू रूपाने, द्रव्य रूपाने किंबहुना संपूर्ण खोली बांधून देणे, या माध्यमातून आपण भरभरून मदत करून ईश्वरी कार्यास हातभार लावून पुण्यसंचय करावा

॥ IN THE NAME OF NAVAVIDHA BHAKTI, TO BUILD 9 SADHAK KUTIR MEDITATION COTTAGES SANKALP ॥

1) Shravanam 2) Kirtanam 3) Vishnusmaranam 4) Padsevanam 5) Archanam 6) Vandanam 7) Dasyam 8) Sakhyam 9) Atmanivedanam
At Vasantgadkar Adhisthana, various spiritual activities are held throughout the year. Akhand Naam Week, Dhyan Shibir Week, Shrimad Dnyaneshwari, Sant Tukaram Gatha, Shri Eknathi Bhagwat, Dasbodh, Sant Kabir Dohe etc. residential camps are held to listen to spiritual expressions and meditate on Naam. Renowned devotees, seekers and devotees who have faith in Vasantgadkar Adhishthana and Shri Sadguru Janardhan Maharaj Vasantgadkar come from all over the country for various spiritual activities. Alishan intends to build a grand-divine seeker’s residence with all the comforts to make their accommodation as comfortable as possible. To build this work in the form of goods, in fact the whole room in the form of material, through this means we should contribute to the divine work and accumulate merit.
Jai Gurudev

॥ गोशाळा संकल्प॥

गौशाळा… हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अध्यात्म रुपाने गोपाल: गो म्हणजे शरीर, पाल म्हणजे संभाल करणारा. गोकुळ : गो म्हणजे शरीर, कुळ म्हणजे इंद्रिय. गोविंद : गो म्हणजे पृथ्वी, विंद म्हणजे विलीन झालेला. अज्ञान जीवाला हा अव्यक्त परमात्मा लक्षात यावा म्हणून व्यासांनी दृष्टांत रूपाने या शब्दाला गाय म्हणून संबोधले. नवजात बालकाला आईच्या दुधाला पर्याय म्हणून गाईचे दूध पाजले जाते म्हणून गाईला गोमाता असे म्हणतात. जिथे भगवान श्रीकृष्णाची मंदिर असतात तिथे गाईंच्या वास असतो. योगायोगाने वसंतगड अधिष्ठानावरती राधा कृष्णाचे छान मंदिर आहे. परम पवित्र गाईंचे महत्त्व लक्षात घेता, श्री सद्गुरू जनार्दन महाराज अधिष्ठानावरती गोशाळा उभारण्याचा संकल्प आहे. या संकल्पपूर्तीसाठी दात्यांनी हजारो हाताने सहकार्य करावे आणि ईश्वर कार्यास सहभागी व्हावे.

॥ Goshala Sankalp ॥

Gaushala… Cow has a unique importance in Hinduism. Gopal in spirituality: Go means body, Pal means maintainer. Gokul: Go means body, Kula means senses. Govinda: Go means earth, Vinda means merged. Vyasa Rishi figuratively referred to this word as a cow so that the ignorant soul could realize this unmanifest Supreme Being. A cow is called Gomata because the newborn baby is fed cow’s milk as an alternative to mother’s milk. Where there are temples of Lord Krishna, there is the smell of cows. Incidentally there is a nice temple of Radha Krishna at Vasantgad Adhisthanavar. Considering the importance of the most sacred cows, it is resolved to set up a Goshala on Shri Sadguru Janardhan Maharaj Adhishthana. For the fulfillment of this resolution, donors should cooperate with thousands of hands and participate in God’s work.
Jai Gurudev

॥ अखंड अन्नछत्र प्रसादालय संकल्प ॥

दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान हे अन्नदान असते, कारण या दानामध्ये भोजन करण्याची इच्छा तृप्त होते. जिथे इच्छेची तृप्ती होते ते दान म्हणजे अन्नदान होय. वर्षातून वसंतगडकर अधिष्ठानावरती, मासिक पौर्णिमा सत्संग, गुरुपौर्णिमा उत्सव, वै. सद्गुरू जनार्दन महाराज पुण्यतिथी उत्सव, चंपाषष्टी पारायण सोहळा, अशा विविध कार्यक्रमासाठी महाराष्ट्र आणि देशभरातून हजारो भाविक येत असतात. त्यांच्या भोजन, प्रसादाची व्यवस्था व्हावी म्हणून, अखंड अन्नछत्र या संकल्पनेतून सुंदर भव्य दिव्य प्रसादाला याची इमारत उभी करण्याचा संकल्प आहे. या इमारत बांधणीसाठी सडळ हाताने सढळ भरभरून आर्थिक मदत करा आणि ईश्वरी कार्यात सहभागी व्हा, दैनंदिन अन्नदान निधी, मासिक अन्नदान निधी, त्रेमासिक अन्नदान निधी, वार्षिक अन्नदान निधी या योजनेखाली सर्वांनी सहभागी व्हा!

॥ Akhand Annachhatra Prasadalaya Sankalp ॥

The best charity among charities is the charity of food, because in this charity the desire to eat is satisfied. Where desire is satisfied, charity is food. Annually Vasantgadkar Adhisthanavarti, Monthly Poornima Satsang, Guru Poornima Utsav, Vai. Thousands of devotees come from Maharashtra and the country for various events like Sadguru Janardhan Maharaj Punyatithi Utsav, Champashashti Parayan Sohla. In order to arrange their food and prasad, it is decided to build this building for beautiful grand divine prasad from the concept of Akhand Annachhatra. For the construction of this building, donate generously and participate in God’s work, daily food donation fund, monthly food donation fund, quarterly food donation fund, annual food donation fund under this scheme!
Jai Gurudev

॥ ग्रंथालय व कार्यालय संकल्प॥

आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने | शब्दची शस्त्रे, यत्ने करू ||
संत साहित्य हे परमार्थिक जीवनाचा अविभाज्य अंग आहे. आज- काल प्रत्यक्ष राज योगी सद्गुरु भेटणे कठीण आहे. वर्तमान काळात ग्रंथरूपाने सद्गुरूंचीच भेट होत असते. वेगवेगळ्या दृष्टांत, सिद्धांत आणि वेदांताच्या आधाराने अनाकलनीय परमात्मा समजावून सांगण्याचा किंबहुना वाचकास ब्रह्मतत्वाचा अनुभव देण्याचा सामर्थ्य संतांच्या साहित्यामध्ये आहे. जीवाला प्रत्यक्ष परब्रह्माचा अनुभव तात्काळ येतो आणि म्हणून वसंत गड अधिष्ठानावरती वाचकास, नाम धारकास ग्रंथसंपदा उपलब्ध व्हावी, भारतातील थोर विचारवंत, संत आणि साहित्यिक या सर्वांची पुस्तके, शास्त्रग्रंथ, पुराण सहज उपलब्ध व्हावी आणि अधिष्ठानावरून प्रकाशित केले जाणारे सर्व साहित्य वाचकांना प्राप्त व्हावेत म्हणून ग्रंथालयाची इमारत व संस्थेचे कार्यालय उभे करण्याचा मानस आहे.

॥ Library and office Sankalp॥

Wealth at home, gems of words Weapons of words, strive ||

Saint literature is an integral part of spiritual life. Nowadays it is difficult to meet Raj Yogi Sadhguru in person. In the present time only Sadguru is met in the form of books. The literature of sages has the power to explain the mysterious God on the basis of various visions, theories and Vedanta, in fact giving the reader an experience of Brahmanism. The soul gets the real experience of Parabrahm immediately and therefore, the library should be available to the reader, the name bearer of the Vasant Gad Adhisthana, the books, scriptures, Puranas of all the great intellectuals, saints and writers of India should be easily available and all the literature published by the adhisthana should be made available to the readers. The organization intends to set up an office.
Jai Gurudev

॥ संस्थेचे इतर संकल्प॥

वै. सद्गुरू जनार्दन महाराजांच्या नावाची भव्यदिव्य कमान उभारणे * संपूर्ण मंदिर परिसरामध्ये वॉल कंपाऊंड बांधणे. * रिकाम्या जागेत पेव्हर ब्लॉक बसविणे * दर्शन बारी बांधणे * चिंतन बाग तयार करणे व शोभिवंत फुलझाडे लावणे. * राधाकृष्ण मूर्ती व व सद्गुरू जनार्दन महाराज यांची मूर्ती नव्याने स्थापन करून मंदिर गाभारा सुबह सुशोभित करणे. * शास्त्रीय संगीत शिक्षण आणि वारकरी शिक्षण हॉल तयार करणे * संस्थाना वरील कर्मचारी निवास इमारत बांधणे. * संत चरण रज बाळकृष्ण दादा श्रींच्या भेटीसाठी येणार्या व्यक्तींसाठी मीटिंग तयार करणे. आपल्यासारखे ईश्वरी कार्यास मदत करणाऱ्या थोर परम दात्यांच्या मुले हे धर्मकार्य टिकून आहे. पुन्हा एकदा सर्व दात यांचे चरणी विनम्र भावनेने नतमस्तक होतो.

॥ Other Sankalp of the organization ॥

Erecting a magnificent arch in the name of Vaikunth Sadguru Janardhan Maharaj
It is the children of great donors like us who help the godly work that this charity survives. Once again all the teeth prostrate at their feet in humble spirit.
Jai Gurudev

Donations/ देणगी(put the gpay qr scan code here)

NAME : Shri Sadguru Janardhan Maharaj Vishvast
Ac. No. : 120001191362
IFSC : CNRB0004512
BANK : Canara Bank, Vasantgad

Contact

ADDRESS: Shree Sadguru Janardan Maharaj Vishvast Sanstha, Vasantgad, Tal. Karad, Dist, Satara – 415114

Vasantgadkar Foundation

“Anahat Meditation Centre, Sri Kshetra Vasantgad”