Call Us

+91 80803 39950

Address

Vasantgad, Karad, Satara, Maharashtra.

|| ध्यान मंदिर संकल्प ||

शुद्ध निश्चल स्थिर आत्मा शरीराच्या संगाने शरीराचे जडत्व स्वीकारतो आणि मीच देह आहे अशा कल्पनेत तो वावरत राहतो या देहात राहून देह बुद्धी न सोडता आपल्या मुळ स्वरूप तत्त्वानुसार शांती आणि आनंद मिळवण्यासाठी धडपड करीत असतो. परंतु देहतादात्म्यामुळे त्याला आत्मानंदाची अनुभूती घेता येत नाही म्हणूनच मनुष्य रुपी शरीराला शांती,समाधान आनंद, मिळण्यासाठी जो विधी करावा लागतो त्या विधीला ध्यान म्हणतात या ध्यानाच्या माध्यमातून मनुष्याला शांती आनंद समाधान आणि स्थिरता मिळावी आणि मनुष्य भव दुःखापासून मुक्त व्हावा त्यांची प्रापंचिक आसक्ती, विषयासक्ती, दूर व्हावी म्हणून वसंतगडकर आश्रमा आवर्ती कमीत कमी शंभर लोक एकावेळी ध्यान करतील असे भव्यदिव्य, हवेशीर ध्यान मंदिर उभारण्याचा संकल्प आहे या पवित्र धर्म कार्यास दात्यांनी भरभरून दान द्यावे आणि ईश्वर कार्यास हातभार लावावा…

|| MEDITATION MANDIR SANKALP ||

He dwells in the idea that the pure, immovable, soul is associated with the body, accepts the inertness of the body and I am the body. Staying in this body without leaving the body consciousness, according to our original nature, we strive to achieve peace and happiness. But he does not get the feeling of Atma Nanda because of the body. That is why the ritual that the human body has to perform to attain peace, contentment and happiness is called meditation. Through this meditation, it is resolved to build a grand and breezy meditation temple where at least one hundred people will meditate on Vasantgadkar Adhishthana at a time so that man can get happiness, peace, joy, contentment and stability and his life will be freed from suffering, his worldly attachment and subject attachment will be removed. Donors should donate generously to this holy work and contribute to God’s cause.
Jai Gurudev

नवविधा भक्तीच्या नावाने अशा पद्धतीचे 9 साधक कुटिर बांधण्याच्या संकल्प

१) श्रवणम् २) कीर्तनम् ३) विष्णुस्मरणम् ४) पादसेवनम् ५) आर्चनम् ६) वंदनम् ७) दास्यम् ८) सख्यम् ९) आत्मनिवेदनम्
वसंतगडकर अधिष्ठानावर, वर्षभर वेगवेगळे आध्यात्मिक उपक्रम होत असतात. अखंड नाम सप्ताह, ध्यान शिबिर सप्ताह, श्रीमद् ज्ञानेश्वरी, संत तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत, दासबोध, संत कबीर दोहे अशा विविध ग्रंथावर अध्यात्मिक निरुपणे श्रवण करण्यासाठी व नाम चिंतनासाठी निवासी शिबिरे होत असतात. वसंतगडकर अधिष्ठानावर आणि श्री सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्यावर श्रद्धा असलेले नामदारक ,साधक व भाविक महाराष्ट्र किंबहुना देश विदेशातून विविध अध्यात्मिक उपक्रमासाठी येत असतात. त्यांच्या निवासाची सोय उत्तमरित्या व्हावी, म्हणून अलिशान सर्व सोयींनी युक्त, भव्य-दिव्य साधक निवास उभारण्याच्या मानस आहे. या कार्यास वस्तू रूपाने, द्रव्य रूपाने किंबहुना संपूर्ण खोली बांधून देणे, या माध्यमातून आपण भरभरून मदत करून ईश्वरी कार्यास हातभार लावून पुण्यसंचय करावा

॥ IN THE NAME OF NAVAVIDHA BHAKTI, TO BUILD 9 SADHAK KUTIR MEDITATION COTTAGES SANKALP ॥

1) Shravanam 2) Kirtanam 3) Vishnusmaranam 4) Padsevanam 5) Archanam 6) Vandanam 7) Dasyam 8) Sakhyam 9) Atmanivedanam
At Vasantgadkar Adhisthana, various spiritual activities are held throughout the year. Akhand Naam Week, Dhyan Shibir Week, Shrimad Dnyaneshwari, Sant Tukaram Gatha, Shri Eknathi Bhagwat, Dasbodh, Sant Kabir Dohe etc. residential camps are held to listen to spiritual expressions and meditate on Naam. Renowned devotees, seekers and devotees who have faith in Vasantgadkar Adhishthana and Shri Sadguru Janardhan Maharaj Vasantgadkar come from all over the country for various spiritual activities. Alishan intends to build a grand-divine seeker’s residence with all the comforts to make their accommodation as comfortable as possible. To build this work in the form of goods, in fact the whole room in the form of material, through this means we should contribute to the divine work and accumulate merit.
Jai Gurudev

॥ गोशाळा संकल्प॥

गौशाळा… हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अध्यात्म रुपाने गोपाल: गो म्हणजे शरीर, पाल म्हणजे संभाल करणारा. गोकुळ : गो म्हणजे शरीर, कुळ म्हणजे इंद्रिय. गोविंद : गो म्हणजे पृथ्वी, विंद म्हणजे विलीन झालेला. अज्ञान जीवाला हा अव्यक्त परमात्मा लक्षात यावा म्हणून व्यासांनी दृष्टांत रूपाने या शब्दाला गाय म्हणून संबोधले. नवजात बालकाला आईच्या दुधाला पर्याय म्हणून गाईचे दूध पाजले जाते म्हणून गाईला गोमाता असे म्हणतात. जिथे भगवान श्रीकृष्णाची मंदिर असतात तिथे गाईंच्या वास असतो. योगायोगाने वसंतगड अधिष्ठानावरती राधा कृष्णाचे छान मंदिर आहे. परम पवित्र गाईंचे महत्त्व लक्षात घेता, श्री सद्गुरू जनार्दन महाराज अधिष्ठानावरती गोशाळा उभारण्याचा संकल्प आहे. या संकल्पपूर्तीसाठी दात्यांनी हजारो हाताने सहकार्य करावे आणि ईश्वर कार्यास सहभागी व्हावे.

॥ Goshala Sankalp ॥

Gaushala… Cow has a unique importance in Hinduism. Gopal in spirituality: Go means body, Pal means maintainer. Gokul: Go means body, Kula means senses. Govinda: Go means earth, Vinda means merged. Vyasa Rishi figuratively referred to this word as a cow so that the ignorant soul could realize this unmanifest Supreme Being. A cow is called Gomata because the newborn baby is fed cow’s milk as an alternative to mother’s milk. Where there are temples of Lord Krishna, there is the smell of cows. Incidentally there is a nice temple of Radha Krishna at Vasantgad Adhisthanavar. Considering the importance of the most sacred cows, it is resolved to set up a Goshala on Shri Sadguru Janardhan Maharaj Adhishthana. For the fulfillment of this resolution, donors should cooperate with thousands of hands and participate in God’s work.
Jai Gurudev

॥ अखंड अन्नछत्र प्रसादालय संकल्प ॥

दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान हे अन्नदान असते, कारण या दानामध्ये भोजन करण्याची इच्छा तृप्त होते. जिथे इच्छेची तृप्ती होते ते दान म्हणजे अन्नदान होय. वर्षातून वसंतगडकर अधिष्ठानावरती, मासिक पौर्णिमा सत्संग, गुरुपौर्णिमा उत्सव, वै. सद्गुरू जनार्दन महाराज पुण्यतिथी उत्सव, चंपाषष्टी पारायण सोहळा, अशा विविध कार्यक्रमासाठी महाराष्ट्र आणि देशभरातून हजारो भाविक येत असतात. त्यांच्या भोजन, प्रसादाची व्यवस्था व्हावी म्हणून, अखंड अन्नछत्र या संकल्पनेतून सुंदर भव्य दिव्य प्रसादाला याची इमारत उभी करण्याचा संकल्प आहे. या इमारत बांधणीसाठी सडळ हाताने सढळ भरभरून आर्थिक मदत करा आणि ईश्वरी कार्यात सहभागी व्हा, दैनंदिन अन्नदान निधी, मासिक अन्नदान निधी, त्रेमासिक अन्नदान निधी, वार्षिक अन्नदान निधी या योजनेखाली सर्वांनी सहभागी व्हा!

॥ Akhand Annachhatra Prasadalaya Sankalp ॥

The best charity among charities is the charity of food, because in this charity the desire to eat is satisfied. Where desire is satisfied, charity is food. Annually Vasantgadkar Adhisthanavarti, Monthly Poornima Satsang, Guru Poornima Utsav, Vai. Thousands of devotees come from Maharashtra and the country for various events like Sadguru Janardhan Maharaj Punyatithi Utsav, Champashashti Parayan Sohla. In order to arrange their food and prasad, it is decided to build this building for beautiful grand divine prasad from the concept of Akhand Annachhatra. For the construction of this building, donate generously and participate in God’s work, daily food donation fund, monthly food donation fund, quarterly food donation fund, annual food donation fund under this scheme!
Jai Gurudev

॥ ग्रंथालय व कार्यालय संकल्प॥

आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने | शब्दची शस्त्रे, यत्ने करू ||
संत साहित्य हे परमार्थिक जीवनाचा अविभाज्य अंग आहे. आज- काल प्रत्यक्ष राज योगी सद्गुरु भेटणे कठीण आहे. वर्तमान काळात ग्रंथरूपाने सद्गुरूंचीच भेट होत असते. वेगवेगळ्या दृष्टांत, सिद्धांत आणि वेदांताच्या आधाराने अनाकलनीय परमात्मा समजावून सांगण्याचा किंबहुना वाचकास ब्रह्मतत्वाचा अनुभव देण्याचा सामर्थ्य संतांच्या साहित्यामध्ये आहे. जीवाला प्रत्यक्ष परब्रह्माचा अनुभव तात्काळ येतो आणि म्हणून वसंत गड अधिष्ठानावरती वाचकास, नाम धारकास ग्रंथसंपदा उपलब्ध व्हावी, भारतातील थोर विचारवंत, संत आणि साहित्यिक या सर्वांची पुस्तके, शास्त्रग्रंथ, पुराण सहज उपलब्ध व्हावी आणि अधिष्ठानावरून प्रकाशित केले जाणारे सर्व साहित्य वाचकांना प्राप्त व्हावेत म्हणून ग्रंथालयाची इमारत व संस्थेचे कार्यालय उभे करण्याचा मानस आहे.

॥ Library and office Sankalp॥

Wealth at home, gems of words Weapons of words, strive ||

Saint literature is an integral part of spiritual life. Nowadays it is difficult to meet Raj Yogi Sadhguru in person. In the present time only Sadguru is met in the form of books. The literature of sages has the power to explain the mysterious God on the basis of various visions, theories and Vedanta, in fact giving the reader an experience of Brahmanism. The soul gets the real experience of Parabrahm immediately and therefore, the library should be available to the reader, the name bearer of the Vasant Gad Adhisthana, the books, scriptures, Puranas of all the great intellectuals, saints and writers of India should be easily available and all the literature published by the adhisthana should be made available to the readers. The organization intends to set up an office.
Jai Gurudev

॥ संस्थेचे इतर संकल्प॥

वै. सद्गुरू जनार्दन महाराजांच्या नावाची भव्यदिव्य कमान उभारणे * संपूर्ण मंदिर परिसरामध्ये वॉल कंपाऊंड बांधणे. * रिकाम्या जागेत पेव्हर ब्लॉक बसविणे * दर्शन बारी बांधणे * चिंतन बाग तयार करणे व शोभिवंत फुलझाडे लावणे. * राधाकृष्ण मूर्ती व व सद्गुरू जनार्दन महाराज यांची मूर्ती नव्याने स्थापन करून मंदिर गाभारा सुबह सुशोभित करणे. * शास्त्रीय संगीत शिक्षण आणि वारकरी शिक्षण हॉल तयार करणे * संस्थाना वरील कर्मचारी निवास इमारत बांधणे. * संत चरण रज बाळकृष्ण दादा श्रींच्या भेटीसाठी येणार्या व्यक्तींसाठी मीटिंग तयार करणे. आपल्यासारखे ईश्वरी कार्यास मदत करणाऱ्या थोर परम दात्यांच्या मुले हे धर्मकार्य टिकून आहे. पुन्हा एकदा सर्व दात यांचे चरणी विनम्र भावनेने नतमस्तक होतो.

॥ Other Sankalp of the organization ॥

Erecting a magnificent arch in the name of Vaikunth Sadguru Janardhan Maharaj
It is the children of great donors like us who help the godly work that this charity survives. Once again all the teeth prostrate at their feet in humble spirit.
Jai Gurudev